बिनविरोधला पुढाऱ्यांनी केला विरोध.. निवडणूक तर होणारच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. आज अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीचा डंका वाजला मात्र बिनविरोधची घोषणा केवळ पोकळ ठरली.

नगर तालुक्यात ‘बिनविरोधच्या आवाहन झुगारले असून बहूतेक गावात घमासान होणारच, हे आज अर्ज माघारी नंतर स्पष्ट झाले आहे. तालुक्यात ५९ ग्रामपंचायतीपैकी केवळ वारूळवाडी,

अकोळनेर, दशमी गव्हाण या ३ ग्रामपंचायतच बिनविरोध झाल्या. तर आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये ३o वर्षानंतर निवडणुक होत आहे .

वारूळवाडीची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले तर अकोळनेरची निवडणूक बिनविरोध करण्यात आमदार निलेश लंके यशस्वी ठरले.

अनेक ठिकाणी बिनविरोधाची परंपरा झाली खंडित तालुक्यातील तांदळी वडगाव, आंबिलवाडी, घोसपुरी, शिराढोण या गावात बिनविरोध निवडणुकीचा निर्णय झाला होता.

मात्र ऐनवेळी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्याने या गावातील बिनविरोध निवडणुकीच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर गावातही ३० वर्ष निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यात मागील निवडणुकीपासुन खंड पडला. यावेळीही बुऱ्हाणनगर गावात बिनविरोध निवडीची परंपरा खंडीत झाली.

Leave a Comment