एमजी हेक्टर २०२१’ मध्ये हिंग्लिश व्हॉइस कमांड्स फीचर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-एमजी मोटर इंडियाने एमजी हेक्टरच्या लॉन्च सह भारतीय बाजारात प्रवेश केला होता. या भारतातील पहिल्या इंटरनेट एसयूव्हीला गाहकांचा दमदार प्रतिसाद मिळाला होता.

कंपनी आता या कारचे अपडेटेड व्हर्जन ‘एमजी हेक्टर २०२१’ लॉन्च करणार आहे. या एसयूव्हीमध्ये काही अद्ययावत फीचर्सचा समावेश असणार आहे.

यात हिंग्लिश व्हॉइस कमांड्स हे ऑटो विश्वात प्रथमच देण्यात येणारे फीचर समाविष्ट करण्यात आले आहे. अनेक इन-कार फंक्शन नियंत्रित करण्यासाठी ३५ पेक्षा जास्त हिंग्लिश कमांड्स कार समजू शकेल व त्याला प्रतिसाद देऊ शकेल.

या एसयूव्हीवर आता एफएम चलाओ, टेम्परेचर कम कर दो यासारख्या अनेक कमांड्स असतील. गेल्याच आठवड्यात हेक्टर २०२०च्या इंटेरिअर संबंधित माहिती उघड झाली होती.

ही कार सिंगल टोन (ब्लॅक) इंटेरिअर, ड्युएल-टोन इंटेरिअर, ड्युएल टोन-एक्सटेरिअर अशा अनेक पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. तसेच या कारमध्ये वायरलेस चार्जिंग,

फ्रंट व्हेंटिलेटेड सिट्स (फर्स्ट इन सेगमेंट), ड्युएल-टोन बेज आणि ब्लॅक इंटेरिअरचा पर्यायही उपलब्ध आहे. जेणेकरून केबिनमध्ये अधिक हवेशीर व प्रीमियम अनुभव येईल.

एमजी मोटर अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज नवनवीन उत्पादनं भारतीय बाजारात सदर करत आहे. देशातील पहिली इंटरनेट एसयुव्ही एमजी हेक्टर,

इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही एमजी झेडएस ईव्ही आणि पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-१) प्रीमियम एसयुव्ही एमजी ग्लॉस्टर या एमजी मोटरने लॉन्च केलेल्या वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एमजी मागील ९६ वर्षांमध्ये एक आधुनिक, फ्यूचरिस्टिक आणि इनोव्हेटिव्ह ब्रँडच्या रुपात विकसित झाला आहे.

एमजी मोटर इंडियाचा गुजरातमधील हलोल येथे स्वत:चा कार निर्मिती प्रकल्प आहे. त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ८०,००० वाहनांची असून तेथे जवळपास २,५०० कामगार आहेत.

Leave a Comment