Best Sellers in Electronics
Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar South

१७ जानेवारीला पल्स पोलिओ रविवार जिल्ह्यातील ४ लाखाहून अधिक बालकांना मिळणार पोलिओ लस

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जिल्हयातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना १७ जानेवारी २०२१ रोजी पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे.

त्या संदर्भातील पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज घेतला. एकही बालक लसिकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मोबाईल टीमच्या माध्यमातून लसीकरण नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पूर्वतयारी संदर्भात बैठक झाली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उप जिल्हाधिकारी संदीप नीचीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा,

जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हयात १७ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ३८ हजार ८६६ बालकांना पोलिओची मात्रा दिली जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ३ लाख ७५ हजार ९३७, महानगरपालिका क्षेत्रातील ४६ हजार २२० आणि नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील १६ हजार ६६९ बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे.

त्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला असून आज त्यासंदर्भात जिल्हा टास्क फोर्सची बैठक झाली. त्यात, जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी तपशीलवार आढावा घेतला. सर्व बालकांना पोलिओचा डोस मिळावा यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्पर राहिले पाहिजे. त्यादृष्टीने आवश्यक साधन सुविधा, पोलिओ लस साठवण्यासाठी शीतकरण उपकरणांची संख्या,

गावपातळीवर लस पोहोचवण्यासाठी व्यवस्था आदींचा आढावा घेऊन त्यांनी सूचना केल्या. जिल्ह्यात शंभर टक्के बालकांना पोलिओचा डोस मिळावा, यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांनी प्रयत्न करावे.नागरिकांनीही त्यांच्या ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस लसीकरण केंद्रावर येऊन द्यावा,

असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले. या मोहिमेत १७ जानेवारीला ज्या बालकांना लस मिळाली नसेल त्यांच्यासाठी ग्रामीण भागात १९ जानेवारी ते २१ जानेवारी आणि नागरी भागात १९ जानेवारी ते २३ जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी शोध घेणार आहेत आणि अशा बालकांना लस देणार आहेत.

लसीकरणाच्या या मोहिमेसाठी ८ हजार ७९ आरोग्य कर्मचारी इतके मनुष्यबळ लागणार आहे. त्याचे नियोजन केल्याची माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी दिली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button