Ahmednagar NewsAhmednagar NorthCrime

उपसरपंच असल्याचे भासवणाऱ्या त्या भामट्यावर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. एकीकडे निवडणुकीचा धुराळा उडाला असताना मात्र नेवासा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच चंद्रकला भगवान गंगावणे यांच्या दिलेल्या माहितीनुसार,

तालुक्यात तसेच इतरत्र कुणीतरी अज्ञातव्यक्ती उपसरपंच असल्याचे सांगत फसवणूकी करत असल्याबाबत निदर्शनास आले आहे.

याबाबत असे की, गंगावणे या सन 2019 मध्ये बहुमतांनी विजयी होऊन11 पैकी 7 ग्रामसदस्य यांच्या मतानुसार आजही विद्यमान उपसरपंच आहेत.

परंतु कुणीतरी गावातील की बाहेरील अज्ञातव्यक्ती ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात तसेच इतर कामांबाबतीत शासकीय कार्यालयीन अधिकारी,

कंत्राटदार, गोरगरिबांना तसेच इतर ठिकाणी मीच उपसरपंच असल्याचे दाखवत सांगत भुलथापा तसेच फसवणूक करत असल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान अशा तोतया उपसरपंचावर कारवाई करण्यात यावी याबाबतचे लेखी निवेदन गंगावणे यांनी संबधित कार्यालयास दिले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button