शेवगाव परिसरात दोन घरफोड्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-शेवगाव तालुक्यात दोन ठिकाणीघरफोड घरफोडीचे प्रकार घडले.

पहिल्या घटनेत शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्द येथे राहणारे भगत यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात घुसून सामानाची उचकापायक करत दीड लाखाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

याप्रकरणी नोकरी करणारे संदीप रामकिसन भगत यांनी शेवगाव पोलिसात तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोनि पाटील यांनी भेट दिली.

पोना पवार हे पुढील तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत शेकटे परिसरातच राहणारे शेतकरी आंधळे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात तेथील सामानाची उचकापाचक करत ५० हजाराचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.

शेतकरी आंधळे हे शेतात गेलेले असताना दिवसा 11 ते 6 च्या दरम्यान चोरट्यांनी hi घरफोडी केली. बबन उत्तम आंधळे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment