जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने दिनेश भालेराव यांचा सन्मान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- अहमदनगर येथील क्रीडा मार्गदर्शक दिनेश लक्ष्मण भालेराव यांची महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशनच्या सहसचिवपदी तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर राज्य संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार केला .

महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनची नुकतीच निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. नगर येथील दिनेश भालेराव यांनी ॲथलेटिक्स क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांचा असणारा अनुभव लक्षात घेऊन त्यांना सहसचिव पदाची पुन्हा एकदा पुणे विभागातून संधी मिळाली आहे.

नगर येथील वाडीया पार्क मैदानावरील ट्रॅक रेसर्स फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय प्राविण्यप्राप्त खेळाडू घडवण्याचे कार्य मार्गदर्शक दिनेश भालेराव यांनी केले आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेवर निवड होणारे दिनेश भालेराव हे पहिलेच प्रतिनिधी असून त्यांच्या रूपाने नगरच्या वैभवात भर पडली आहे.

क्रीडा विभागाचे गुणवंत क्रीडा पुरस्कारार्थी असलेले भालेराव यांच्या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते व कबड्डीचे राज्य मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रा. सुनील जाधव, क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर ,सचिन काळे, विशाल गर्जे ,

नंदकुमार रासणे, दिपाली बोडखे ,गौरव परदेशी , बाळासाहेब पवार यांच्या उपस्थितीत सन्मान संपन्न होऊन पुढील क्रीडा कार्यास शुभेच्छा दिल्या .

Leave a Comment