मानवाधिकार अभियान व उर्जिता सोशल फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने. सावित्रीचा पुरस्कार देवून सावित्रीच्या लेकींचा सन्मान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- मानवाधिकार अभियान व उर्जिता सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले जयंती निम्मित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपत

अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या सहा सावित्रीच्या लेकींनां वारसा सावित्रीचा पुरस्कार देवून जेष्ठ शिक्षण तज्ञ व माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी विशेष सरकारी वकील ॲड.मनीषा केळगेंद्रे – शिंदे, मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड, सौ.संध्याताई मेढे,‌ सौ.रुपाली वाघमारे, विजया जाधव, सॅम्युअल वाघमारे, संजय कांबळे, रेव्ह. जे.आर.वाघमारे, अंकम साहेब, जॉन खरात, कमलाकर देठे,

प्रतिक बारसे, विठ्ठल महाराज कोतकर, दिलीप काकडे, सत्यशील शिंदे, रवि गायकवाड, दिपक गायकवाड, राजू धोत्रे, राजेंद्र सातपुते, लियाकत सय्यद, डॅा. विजय साळवे, जग्गू गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सावित्रीच्या विचारांचा वारसा जपत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना वारसा सावित्रीच्या पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, यामध्ये सेंट सेव्हींअर्स शाळेमध्ये शिक्षिका सौ.प्रतिभा दिलीप काकडे, पोलिस विभागामध्ये अनिता किसन गुरवे, पत्रकारिता क्षेत्रात कु. प्रियांका ज्ञानदेव पुंड, आरोग्य क्षेत्रात सुवर्णा समीर दळवी, विधीसेवा मध्ये ॲड. बेबी विलास बोर्डे व योगाचे धडे देणाऱ्या योग शिक्षिका ज्योती प्रभाकर शिरसाठ यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी. अध्यक्षीय भाषणात जेष्ठ शिक्षण तज्ञ व माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे म्हणाले कि भारतातील आद्य मुख्याध्यापिका, आद्य शिक्षिका, समाजसुधारक म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. उपेक्षित महिलांचे शिक्षण व अन्याय, अत्याचार, अनिष्ठ रुढींच्या विरोधात अखंड संघर्ष करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे आद्य समाजसुधारक होत्या. स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी चांगल्या प्रकारे पुढे नेले.

त्यांनी कामगारांसाठी रात्रशाळा काढल्या. तेथेही अध्यापक करीत देवदासी पद्धत बंद करणे, बालविवाहाला बंदी करणे केशवपनाची पद्धत बंद करणे, विधवा विवाहाला असलेल्या बंदीविरुद्ध सामाजिक जागृती करणे इत्यादीच्या परिवर्तनासाठी त्यांनी सामाजिक जागृती केली. त्यांनी समाजप्रबोधन करण्यासाठी शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी कविता रचल्या. त्यांच्या काव्याचे विषय सामाजिक आहेत.

त्यात जातीभेद निर्मूलन, स्त्री शिक्षणाचे महत्व, विधवा विवाह, बालविवाह, शूद्रा अतिशूद्रांसाठी शिक्षण देत होते. सावित्रीबाई समाज प्रबोधन व समाज जागृतीसाठी सर्व सामान्यांना समजेल अशा भाषेत गद्य,पद्य, पत्रे, भाषणे आणि गाणी इत्यादींच्या माध्यमातून विचार मांडत होते. उपेक्षित स्त्रिया, कामगार आणि समाजातील खालच्या स्तरातील घटकांना अज्ञान व दारिद्रयाच्या अंधारातून बाहेर काढणे,त्यांना स्वाभिमान व स्वावलंबी बनविणे,त्यांच्यावर होणारे समाजिक अन्याय,अत्याचार दूर व्हावेत, अंधश्रद्धा, रुढी नष्ट होऊन त्यांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून निर्माण व्हावा.

यासाठीच सावित्रीबार्इंनी देह व लेखणी झिजवली. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांना फक्त स्त्री शिक्षिका या चाकोरीतून बघण्यापेक्षा तिच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजून घेणे आजच्या स्थितीत अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे स्त्री शिक्षिका सोबतच इतर क्षेत्रातील महिलांचाहि वारसा सावित्रीचा पुरस्कार देवून गौरव होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत मानवाधिकार अभियान चे अभिनंदन केले.

तसेच सावित्रीबाई फुले यांनी सुरवातीचे शिक्षण ज्या मराठी मिशनच्या क्लेराब्रूस शाळेत घेतले त्या शाळेचे संवर्धन व्हावे असे त्यांनी आवर्जून सांगितले व यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विशेष सरकारीवकील ॲड.मनीषा शिंदे म्हणाल्या की,

सावित्रीबाई फुले यांनी व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहे व सावित्रीबाईंनी महिलांना खऱ्या अर्थाने जगण्याची दिशा देऊन महिलांना सन्मान दिला आहे

अशी भावना त्यांनी व्यक्त केली व या कार्यक्रमाची सुरुवात संविधान वाचून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड. संतोष गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार सौ. रुपाली सॅम्युअल वाघमारे यांनी केले. तर पुरस्कार मिळालेल्या महिलांनी सत्काराला उत्तर देत म्हणाले की पुरस्काराने आम्हाला लढण्याचे बळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Leave a Comment