Best Sellers in Electronics
Ahmednagar NewsAhmednagar North

धक्कादायक ! दुचाकीवर चाललेल्या जोडप्यावर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- अकोले तालुक्यातील ढोकरी शिवारात दुचाकीवर चाललेल्या एका दाम्पत्यावर बिबट्यांच्या जोडीने हल्ला चढविला.

दरम्यान सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली. बिबट्यांच्या या हल्ल्यात दुचाकीवर मागे बसलेली महिला जखमी झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कैलास माधव पुंडे व मनीषा कैलास पुंडे हे दांपत्य ढोकरीहून अकोलेकडे जात असताना गाव परिसरात असताना बिबट्याच्या जोडीने अंधाराचा फायदा घेऊन या दुचाकीस्वारांवर हल्ला चढविला.

मागे बसलेल्या मनीषा पुंडे यांच्या पायावर व कंबरेवर पंजा मारल्याने जखमी झाल्या, मात्र त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोकांनी धाव घेतल्याने व आरडाओरडा केल्याने बिबटे पसार झाले.

त्यांच्यावर अकोले सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले. दरम्यान या परिसरात सतत बिबट्याचे वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button