बिग ब्रेकिंग : बाळ बोठे याच्याविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी ! आता होणार असे काही…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी तथा पत्रकार बाळ ज. बोठे याच्याविरुद्ध स्टॅंडिंग वॉरंट जारी झाले आहे. पारनेर न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंट अर्जावर आज निर्णय दिला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराटे यांनी हा निर्णय दिला आहे,

अशी माहिती पोलिसांनी दिली. या वॉरंटमुळे पसार बोठे याच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांना या वॉरंटमुळे बोठे याला लवकर पकडणे शक्य होणार आहे.

यामुळे आजपासून आरोपी बाळ बोठेला पकडण्याचे काम वेगाने होऊ शकते. न्यायालयाचे हे वॉरंट सर्व पोलिसांना पाठविण्यात येईल. त्यामुळे नगरच नव्हे तर अन्य कोठेही तेथील पोलिसांना आरोपी दिसला,त्याच्या वास्तव्याची माहिती मिळाली तर ते पोलिसही आरोपीला अटक करू शकतात.

रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला हत्या झाली. या हत्याकांडात आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. या हत्याचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचा संशय आहे. पोलिसांच्या तपासात तसे तांत्रिक पुरावे पुढे आले आहे. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर आहे.

गेल्या महिन्यांभरापासून बोठेचा या गुन्ह्यात पोलीस शोध घेत आहे. बोठेच्या शोधात आतापर्यंत जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात 45 ठिकाणांपेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकले आहेत. या दरम्यान, पोलीस दलाने बोठेभोवती कायद्याचा फास आवळण्याची तयारी सुरू केली आहे.

जरे हत्याकांड प्रकरणातील महत्त्वाचे आणखी पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या डायरीतील टिपणांमुळे बोठे याच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. जरे यांची हत्या झाल्यानंतर बोठे नगर शहरातून पसार झाला. गेल्या महिनाभरापासून पोलीस त्याचा अविरत शोध घेत आहेत.

तो मात्र प्रत्येकवेळी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहे. जरे यांची हत्या झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली.

या गुन्ह्यात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावे एकत्र केले आहेत. आता केवळ बोठे याच्या अटकेचे आव्हान तपासी यंत्रणेसमोर आहे. पसार होताना बोठे याने स्वत:चा मोबाइल घरीच ठेवला आहे. त्यामुळे लोकेशन काढून त्याचा शोध घेणे हा पर्याय संपलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!