इंदुरीकर महाराज प्रकरणी… ‘तारीख पे तारीख’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-कीर्तनातून ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्याविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा निकाल काय लागणार आहे याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. आज (बुधवार ता.6) होणार्‍या सुनावणीवेळी कामकाजापूर्वीच बचाव पक्षाचे अ‍ॅड.के.डी.धुमाळ यांनी पुढची तारीख देण्याची न्यायालयाला विनंती केली.

न्यायालयाने ही विनंती मान्य करत 13 जानेवारीला सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, आज होणार्‍या सुनावणीवेळी लेखी स्वरुपात म्हणणे मांडण्यास न्यायालयाने निर्देशित केले होते.

मात्र, कामकाजापूर्वीच निवृत्ती महाराज देशमुख यांचे वकील अ‍ॅड.के.डी.धुमाळ यांनी सुनावणीसाठी पुढची तारीख देण्याची विनंती केली.

न्यायालयाने ही विनंती मान्य करत 13 जानेवारीला पुढची सुनावणी ठेवली आहे. आता याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment