दुर्मीळ घुबडाची तस्करी ; सहाजण ताब्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-दुर्मिळ व संरक्षित जातीच्या घुबडाची तस्करी केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम व परांडा तालुक्यातील सहा इसमांना जामखेड पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन वनविभागाकडे सुपूर्द केले.

वनविभागाने वन्य पक्षी तस्करी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सदर सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी माहिती दिली की, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की,

शहरातील मिलिंदनगर शेजारी असलेल्या नागेश विद्यालयाच्या मोकळ्या जागेत सहा इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर, पो.कॉ.संदीप आजबे, शेषराव म्हस्के, आबासाहेब अवारे, सचिन राठोड, संग्राम जाधव, अरूण पवार,

अविनाश ढेरे यांच्या पथकाने त्या परीसरात छापा टाकून आरोपी हरी नेमीनाथ काळे (रा.सामानगाव ता.भुम), लखन उर्फ लक्ष्मण सतिष भोसले (रा.भवनवाडी ता.भूम) राहुल निवृत्त पवार व गणेश निवृत्ती पवार (दोघे.रा. काशिमबाग. ता.परांडा), दिपक राजाभाऊ गायकवाड (रा.सिध्देश्वर नगर, बीड),

ज्ञानेश्वर निवृत्ती पवार (रा.परांडा जि. उस्मानाबाद) या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एक पांढऱ्या रंगाच्या पिशवीत बेकायदेशीररीत्या घुबड जातीचा पक्षी तस्करीच्या उद्देशाने वाहतूक करताना अढळुन आला. यानंतर सदरची घटना वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पुढील कारवाई वनविभागाने केली.

यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवाड वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे, वनरक्षक के.आय.पवार, आर एस देवकर वनरक्षक ताहेर अली सय्यद, के.एसग़ांगुर्डे, पी.एस.उबाळे, रामभाऊ मुरुमकर, चिलगर डोंगरे, अजिनाथ भोसले, सुरेश भोसले यांच्या पुढील कारवाई करत आहेत.

Leave a Comment