वनरक्षक महिलेस धक्काबुक्की करत शिवीगाळ केली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-गृहिणी असो नाहीतर नौकरदार… आजही पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात महिलांना तुच्छ वागणूक दिली जाते. यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

नुकतेच एका सरकारी महिला अधिकाऱ्यास धक्कबुक्की व शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार खुद्द महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा तालुका संगमनेर मध्ये घडला आहे.

या प्रकरणी घारगाव पोलिसांनी एकावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

मंगळवारी वनरक्षक बालिका फुंदे या गावातील जंगल फिरस्ती करून गावाजवळच्या फाट्यावर ग्रामस्थांबरोबर चर्चा करत होत्या.

त्यावेळी शिवाजी मुक्ताजी खेमनर हा तेथे आला आणि त्याने वनरक्षक फुंदे यांच्या हाताला झटका दिला व पाठीमागे लोटून शिवीगाळ केली.

याप्रकरणी वनरक्षक बालिका फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी शिवाजी मुक्ताजी खेमनर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत हे करत आहे.

Leave a Comment