Best Sellers in Electronics
Ahmednagar CityAhmednagar NewsBreaking

छिंदमला न्यायालयाचा दणका ती याचिका फेटाळली

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- अहमदनगर महापालिकेचे तत्कालिन नगरसेवक श्रीपाद शंकर छिंदमला हायकोर्टाने दणका दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढल्याबद्दल नगरविकास विभागाने त्याचे नगरसेवकपद रद्द केले होते.

या निर्णयाविरोधात छिंदम याने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. न्या. मंगेश एस. पाटील यांनी बुधवारी (दि.६) छिंदमची याचिका फेटाळत राज्य शासनाचा निर्णय कायम ठेवला.

नगरसेवकपद रद्दचे आदेश बेकायदेशीर असून, म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी दिली नसल्याचे म्हणणे छिंदम याने मांडले होते. सुनावणीदरम्यान सरकारी वकील ज्ञानेश्­वर काळे यांनी राष्ट्रपुरुषाची बदनामी करणारे कृत्य घृणास्पद असल्याचे निदर्शनास आणून दिले.

गुन्हा दाखल झाल्याने त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. हे समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य असून त्याच्या म्हणण्याला कायदेशोर आधार नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले.

खंडपीठाने शासनाचे आदेश कायम ठेवत छिंदमची याचिका फेटाळली. नगर मनपातर्फे अँड.व्ही. डी. होण यांनी बाजू मांडली. त्यांना अँड. के. एन. लाखंडे यांनी सहकार्य केले.

नेमके काय होते प्रकरण :- नगर महापालिकेत नगरसेवक असलेल्या छिंदमने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेचे अधिकारी अशोक प्रभाकर बिडवे यांना शिवीगाळ करीत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.

यासंबंधीचे संभाषण सर्वत्र व्हायरल झाले होते. छिंदमवर नगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर महापालिकेच्या वतीने विशेष सभा बोलावून २६ फेब्रुवारी २०१८ रोजी छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते घेवून तो ठराव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला. राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०२० रोजी छिंदमचे नगरसेवकपद रद्द केले होते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button