‘एक शाम रफी के नाम’कार्यक्रमास प्रतिसाद तुम मुझे यूं भुलाना पाओगे…. रफी यांना आदरांजली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- मोहमंद रफी यांच्या जयंतीनिमित्त अमिन धाराणी आयोजित म्युझिकल स्टार्स फेसबुक पेज च्या माध्यमातून रहेमत सुलतान सभागृह येथे ‘एक शाम रफी के नाम’ या मोहमंद रफी यांच्या सुरेल गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सुरुवातीला गुलशन धाराणी यांनी मोहंमद रफी यांनी गायलेल्या ‘आदमी मुसाफिर है’ या गीताने महान गायक मोहंमद रफी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर सुभाष पोटोळे यांनी ‘ तेरी आँखों के सीवा..’ हे गीत सादर करुन सभागृहाची वाह ऽ वाह सुरुवातीस मिळवून कार्यक्रमास रंग भरण्यास सुरुवात केली. यानंतर सुनिल भंडारी यांनी ‘कोई नजराना ले के आया हूं मै…’ हे गाणे सादर केले. त्यानंतर समीर खान यांनी ‘पर्दा है पर्दा..’ या कव्वालीने सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडा निर्माण झाला. यानंतर अमिन धाराणी यांनी ‘दर्द दे दिल दर्दे जिगर…’ हे गीत सादर करुन सभागृहात गांभीर्य निर्माण केले.

यानंतर दर्दभरे गीत सादर करण्यासाठी प्रसिद्ध असणारे किरण उजागरे यांनी ‘चाहुंगा मै तुझे.., ओ मेरी महेबुबा..’तर अमिन धाराणी यांनी यानंतर ‘मस्त बहारों का मै आशिक…, चले थे साथ मिलकर …’ हे गीत सादर करुन सभागृहास युवा काळची आठवणींना उजाळा दिला.

यानंतर अ‍ॅड.गुलशन धाराणी यांनी ‘दिवाने है..दिवानों को नजर चाहियें…, कितना प्यारा वादा…’ हे प्रफुल्लीत गीत समीर खान व सुभाष पाटोळे यांच्यासह द्वंदगीत सादर केले. तर निता माने यांनी ‘युंही तुम मुझसे बात करती हो..,‘वादा करले साजना…’ हे गीत किरण उजागरे व समीर खान यांच्याबरोबर सादर करुन सभागृहात हलचल निर्माण केली. यानंतर अमिन धाराणी यांनी ‘आते जाते हुऐ मै…’ हे गीत सादर करुन सभागृहास नाचविले.

गायक दिनेश यांनी ‘ याद ना जाये ….’ हे गीत सादर करुन रसिकांची वाह ऽ वा! मिळविली.

आबीद दुलेखान यांनी शेरशायरीने सूत्रसंचालनातून रसिकांना बांधून ठेवले. कार्यक्रमास संगीतप्रेमी व मोहंमद रफी यांचे चाहते रसिकांचा मोठया संख्येने उपस्थित होते. आजपर्यंत झालेल्या विविध ऑनलाईनच्या माध्यमातील कार्यक्रमास 5 हजार ते 33 हजार लोकांनी कार्यक्रम पाहिला आहे.

Leave a Comment