Ahmednagar CityAhmednagar News

कोरोना संसर्गाच्या संकटकाळात नगर जिल्ह्यातील सेवाकार्याचा राज्यपालांकडून गौरव.

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-कोरोना संसर्गाच्या संकटकाळात विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी केलेल्या पथदर्शी कामाचा गौरव आज शुक्रवार दिनांक ८ जानेवारी रोजी केशवसृष्टी ट्रस्ट (मुंबई)तर्फे होत आहे.

मुंबईतील राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील ‘मिशन राहत’ उपक्रमाचा होणारा गौरव उपक्रमाचे संयोजक अजित बाळासाहेब कुलकर्णी स्वीकारणार आहेत.

स्नेहालय परिवारातर्फे अनिल गावडे ,राजीव गुजर आणि सौ.अनिता अजित माने यांनी ही माहिती दिली या निमित्ताने कोवीड संसर्ग कालखंडात सेवारत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय ,अशासकीय व्यक्ती ,संस्था आणि कार्यकर्ते ,

दाते यांचा सन्मान होत आहे. “प्रातिनिधीक स्वरूपात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संस्था आणि कार्यकर्त्यातर्फे आपण हा सन्मान स्वीकारत असल्याचे”, अजित कुलकर्णी यांनी नमूद केले.

“मिशन राहत” ची प्रेरणा :- या संदर्भात मिशन राहत उपक्रमाचे संस्थापक सदस्य श्याम आसावा यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यात स्नेहालय परिवारातील अनाम प्रेम, महामानव बाबा आमटे संस्था (श्रीगोंदे), स्नेहप्रेम (कर्जत), उचल फाउंडेशन (शेवगाव), डॉ.शंकर आडकर ट्रस्ट , अण्णाजी हजारे जनआंदोलन, आदी संस्थांनी अखंड कार्य केले.

या शिवाय घर घर लंगर ,जनकल्याण समिती, यांसारख्या ५३ सामाजिक संस्था तसेच जैन-शीख-माहेष्वरी-मुस्लिम-ख्रिश्चन आदी सर्व जाती आणि धर्म समुहातील मानवतावादी विचारांचे लोक साऱ्या कृत्रिम भेदाना ओलांडून या काळात वंचितांना सेवा देत होते. मिशन राहत , अशा सर्व प्रयत्नांना एका माळेत गुंफणारा धागा होता.

या उपक्रमाचे मार्गदर्शक संजय गुगळे म्हणाले की, मिशन राहत ने दिव्यांग आणि त्यांचे परीवार, झोपडपट्ट्या, लालबत्ती विभाग,फासे पारधी आणि इतर भटके-दलित-आदिवासी समूह, हातावर पोट भरणारे कष्टकरी,या समूहाला जेवण,किराणा,औषधे, रोजगाराची नवी साधने आणि प्रशिक्षण,

शिक्षणाच्या नव्या वाटा आणि साधने लोकसहभागातून अखंड पुरवली. शासन यंत्रणेशी समन्वय ठेवून उत्तर आणि पूर्व भारतातील हजारो श्रमिकांना घरवापसी साठी मदत केली. हनीफ शेख यांनी नमूद केले की, रोटरी क्लब सोबत स्नेहालय परिवाराने चालविलेले कोवीड सेंटर मुळे १६०० कोवीड बाधितांचे निःशुल्क उपचार केले.

स्नेहालय येथील केरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल येथे नगर मधील सर्वात स्वस्त उपचार उपलब्ध होते. ३ हजार कष्टकरी कुटुंबांना दिलेले प्रत्येकी ५ हजार रुपये आणि मागील महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील ११०० वेश्या महिलांना नवजीवन मिळवण्यासाठी मिळालेले प्रत्येकी १५ हजार यांचा कोविड संकटातून उभे राहताना वंचितांना उपयोग झाला, होत आहे.

प्रवीण मूत्याल यांनी सांगितले,की या काळात निर्माण झालेल्या बाल विवाह,कौटुंबिक अत्याचार, अनैतिक मानवी वाहतूक अशा समस्या मिशन राहत समूहातील प्रकल्पांनी सक्षम पणे हाताळल्या. देश आणि समाज संकटात असताना सारे क्षुद्र विषय ,भेदाभेद बाजूस ठेवून संघटीत आणि समर्पित काम झाले.

सुमारे १२ लाख लोकांना मिशन राहत उपक्रमाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ झाल्याचे सह समन्वयक शबाना शेख म्हणाल्या.

मिशन राहत राबविताना सतत सर्वांशी संवाद राखून ,कामातील एकोपा,देशसे वेची प्रेरणा आणि पारदर्शकता अजित यांनी टिकवली. त्यामुळे मिशन राहत परिवाराने एकमताने अजित कुलकर्णी यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडल्याचे फारूक बेग यांनी सांगितले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button