ठाकरे सरकारच्या बैठकीत घेतले गेले ‘हे’ निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत.

या बैठकीत बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा भेटला आहे.

बांधकाम व्यवसायिकांमध्ये या निर्णयामुळे उत्साह संचारला आहे. बैठकीत घेतले गेले ‘हे’ महत्वाकांक्षी निर्णय राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार होणार असून त्यांच्या सेवेसाठी सरकार कटीबद्ध राहील असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.केंद्र सरकारच्या ग्रामीण रस्ते विकास मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मे.विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा.लि.मुंबई संस्थेला मायकेल जॅक्सन कार्यक्रमासाठीचे करमणूक शुल्कमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे करमणूकीला चालना मिळेलm औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय येथे नव्याने 165 खाटा आणि 360 पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र इलेक्ट्रानिक्स धोरण 2016 व फॅब प्रकल्पांकरिता प्रोत्साहनाच्या धोरणात सुधारणा करण्यात येणार.पुणे जिल्ह्यातील वडगाव- मावळ येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश या दोन न्यायालयाला मंजुरी देण्यात आली. आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत कार्यरत संस्थांमध्ये दोन अभ्यासक्रमांच्या समावेशास मान्यता देण्यात आली.

गरीब व सर्वसामान्य लोकांच्या निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. दरम्यान, या आधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्यावेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने विरोध केला होता, पण चर्चा झाल्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Comment