Best Sellers in Electronics
Ahmednagar NewsAhmednagar SouthPolitics

व्हीआरडीई देशाच्या स्वातंत्र्याची आठवण : संस्था हालवू देणार नाही आमदार नीलेश लंके यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-देशाची फाळणी झाली त्यावेळी सध्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीजवळील चखलाला प्रांतातून व्हिआरडीईचे नगरमध्ये स्थलांतर करण्यात आले होते.

माझ्या नगर जिल्हयासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतरची ती आठवण आहे. सध्या ही संस्था नगर येथून चेन्नई येथे हालविण्याच्या हालचाली सुरू असून त्यास आपला ठाम विरोध आहे.

यासंदर्भात आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेउन निवेदन सादर केले असून खा. पवार यांनी दिलेल्या अश्­वासनाप्रमाणे लवरकच या प्रश्­नी संरक्षण मंर्त्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर नगर येथे स्थापन झालेल्या या संस्थेच्या देशभरात सध्या ५२ शाखा आहेत. या संस्थेने आजवर देशासाठी अनेक उपयुक्त संशोधने केलेली असून, नगरच्या संस्थेची देशासह जगभरात वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.

संरक्षण विभागासाठी आवष्यक असलेली वाहने तसेच अन्य सामग्रीही विकसित करण्यात नगरच्या व्हिआरडीईचा मोलाचा  वाटा आहे. वाहनांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचा विशेष ट्रॅक नगरच्या व्हिआरडीई येथे उपलब्ध आहे.

सर्वच अंगांनी नगरच्या संस्थेचे काम उजवे असल्याने ही संस्था हालविण्यामागचे कारण काय असा सवाल करून आ. लंके यांनी ही संस्था इतरत्र हालविण्यास आपला ठाम विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट  केले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button