भुकेल्या बिबट्याने केला चिकन डिनर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने यापूर्वी मानवीवस्तीवर देखील प्राणघातक हल्ले चढविले आहे.

यामध्ये काहींचा बळी देखील गेला आहे. नुकतेच बिबट्याने कोंबड्यांच्या खुरटयावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील माळेगाव पठार गावांतर्गत असलेल्या रामेश्वरदरा येथे शनिवारी (ता.9) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, माळेगाव पठार गावांतर्गत असलेल्या रामेश्वरदरा येथील नवनाथ आबाजी पांडे यांच्या घराजवळच कोंबड्यांचे खुराडे आहे.

या खुराड्यात सुमारे पन्नास मोठ्या कोंबड्या व दहा लहान पिल्ले होती. शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भुकेलेला बिबट्या थेट खुराड्यात घुसला आणि निम्या कोंबड्या फस्त केल्या.

तर काही भीतीने मृत्यूमुखी पडल्या. नेहमीप्रमाणे पांडे पहाटे पाच वाजता झोपेतून उठून घराबाहेर आले असता खुराड्यात बिबट्या दिसला. यावेळी काहीक्षण त्यांचीही भंबेरी उडाली.

मात्र, त्यांना पाहताच बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर खुराड्यात जावून पाहिले असता काही कोंबड्या गतप्राण अवस्थेत दिसल्या. सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळाली असता वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Leave a Comment