आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तडीपार आरोपीला पोलिसांकडून अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार करण्यात आलेला व्यक्ती पुन्हा शहरात आढळून आल्याने संबंधित तडिपारला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान परशुराम ऊर्फ परेश चंद्रकांत खराडे (वय- 34 रा. नालेगाव, नगर) असे या तडीपार व्यक्तीचे नाव आहे. खराडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, 27 एप्रिल 2019 रोजी आरोपी परेश खराडे याला जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार करण्याबाबत आदेश पारीत केला आहे.

सदर आदेशाचा भंग करून आरोपी खराडे कल्याण रोडवरील भावनाऋषी सोसायटी येथे असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपी खराडे यांना अटक करून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने सादर कारवाई केली आहे.

Leave a Comment