‘या’ तालुक्यात वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-जामखेड तालुक्यातील घोडेगाव, पाटोदा व खर्डा येथील तीन जणांचा वेगवेगळ्या घटनांत एकाच दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबत सविस्तर असे की, जामखेड शहरातील कर्जत रोडवरील एका विहिरीच्या पाण्यात बडाल्याने अमोल विश्वनाथ मोरे (वय २५, रा.पाटोदा गरडाचे) याचा मृत्यू झाला.

बरेच दिवस झाले असल्याने सदरचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगताना अढळुन आल्याने ही गोष्ट नागरीकांच्या काल लक्षात आली.

दुसरी घटना तालुक्यातील घोडेगाव येथे दत्तात्रय दगडु आडसूळ (वय ५० वर्षे रा. घोडेगाव) याचा देखील मृतदेह विहिरीत पडुन पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सदरची घटना पहाटेच्या पुर्वी घडली आहे. या बाबत अशोक दत्तात्रय आडसूळ यांनी जामखेड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. तर तिसरी घटना देखील तालुक्यातील खर्डा या ठिकाणी याच दिवशी घडली सचिन हरीशचंद्र डुकरे (वय २३ वर्षे) याने देखील खर्डा येथील आपल्या रहात्या घरी दुपारी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी रतिलाल रोहीदास डोके यांनी जामखेड पोलिसांना खबर दिली आहे. एकाच दिवशी तिघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या तिघांवर जामखेड ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन केले. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. असून पुढिल तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि बडे व जानकर हे करत आहेत.

Leave a Comment