Best Sellers in Electronics
MoneyWorld

अबब! ‘ह्या’ ठिकाणी पेट्रोल मिळते 1.5 रुपये प्रति लिटर ; जाणून घ्या सविस्तर..

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-सध्या पेट्रोलचे दर खूप वाढले आहेत. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 84 रुपयांच्या पुढे गेली आहे. ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सरकार पेट्रोल आणि डिझेलवर बरेच कर लावते. म्हणूनच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचे पर्यंत पेट्रोलची किंमत वाढते. या वाढत्या किमतीमुळे महागाई देखील वाढते. परंतु जगात असा एक देश आहे जेथे पेट्रोल अगदी स्वस्त आहे. व्हेनेज्युएला असा देश आहे, जेथे जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं.

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेज्युएलामध्ये पेट्रोलचा दर केवळ 1.46 रुपये (4 जानेवारी) आहे. व्हेनेज्युएलामध्ये सर्वात मोठे तेलाचे साठे आहेत. त्यामुळे पेट्रोलचा भावही कमी आहे. दुसऱ्या नंबरवर इराण आहे. तेथे पेट्रोलचे प्रतिलिटर दर 4.24 रुपये आहेत. अंगोलामध्ये पेट्रोलची किंमत 17.88 रुपये लिटर आहे.

सर्वात महाग पेट्रोल याठिकाणी विकले जाते :- ग्लोबल पेट्रोल डिझेल प्राईस डॉट कॉम या वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, हाँगकाँगमध्ये सर्वात महाग पेट्रोल असून त्याची किंमत प्रतिलिटर 169.21 रुपये इतकी आहे. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमध्ये 150.29 रुपये,

सीरियात 149.08 रुपये, नेदरलँडमध्ये 140.90 रुपये, नार्वेत 135.38 रुपये आणि फिनलँडमध्ये 133.90 रुपये आहे. इंग्लंडमध्ये पेट्रोल 116 रुपये, स्विझर्लंडमध्ये 115 रुपये, जर्मनीत 116 रुपये, जपानमध्ये 93.62 रुपये, ऑस्ट्रेलियात 68.91 रुपये आणि अमेरिकेत 50.13 रुपये प्रति लिटर दर आहेत.

भारतात का आहेत पेट्रोल – डिझेलचे इतके दर ? :- भारतात शासनाकडून यावर विविध कर लादले गेले आहेत. एक्साइज ड्यूटी हा एक प्रकारचा कर आहे जो भारतात प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यावर किंवा विक्रीवर लादलेला असतो.

सरकार त्यातून पैसे कमावते आणि त्यानंतर त्यातून समाज कल्याणासाठी काम करते. हे लक्षात ठेवा की एक्साइज ड्यूटी हे कस्टम ड्युटीपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे, कस्टम ड्युटी देशाबाहेरुन येणाऱ्या वस्तूंवर लावले जाते.

जाणून घेऊयात आकडेवारीमध्ये – (आयओसी वेबसाइटवर दिलेल्या डेटानुसार) :-

  • बेस प्राइस- 27.37 रुपये प्रति लिटर
  • भाडे – 0.37 रुपये प्रति लिटर
  • एक्साइज ड्यूटी- 32.98 रुपये प्रति लिटर
  • डीलर कमीशन – 3.65 रुपये प्रति लिटर
  • vat- 19 रुपये प्रति लिटर

 

  • (1 जानेवारी 2021 रोजी दिल्लीत पेट्रोलवर आधारित)
  • अशा प्रकारे आपल्यापर्यंत पोहोच होईपर्यंत 27 रुपयांचे पेट्रोल प्रति लिटर 83 रुपये होते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button