या गावात चक्क केंद्रीय मंत्र्यांच्या कोनशिलेवर हातोडा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाळवणी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजन समारंभाच्या कोनशिलेवरच हातोडा टाकण्यात आला.देखभालीचे कारण दाखवीत ही कोनशिला टाकळी ढोकेश्वर येथील टोल नाक्यावर लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग २२२ चे १६१/५७० ते २११ या आणे घाट ते अहमदनगर बाह्यवळण रस्त्याच्या आरंभाच्या भागाचे डांबरी बाजू पट्ट्या सहित दुपदरी रस्त्याची पूनर्स्थापना वदर्जोन्नती करण्याचा शुभारंभ १८ ऑगस्ट २०१४ रोजी रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते भाळवणी बाह्यवळण रस्त्यावर संपन्न झाला होता.

या राष्ट्रीय महामार्गाचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, भाळवणी येथील कोनशिलेची दुरावस्था झाल्याची तक्रार भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत रोहोकले, नरेंद्र मोदी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या स्वियसहाय्यांकडे केली होती.

या तक्रारीची दखल घेत’ या महामार्गाच्या दुरुस्ती देखभालीसाठी ठेका असणाऱ्या पुण्याच्या जितेंद्रसिंह या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी आज भाळवणीतील कोनशिला हातोड्याने तोडुन काढली. ही कोनशिला टाकळी ढोकेश्वरच्या टोल नाक्यावर बसणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment