MoneyWorld

अबब ! 10 दिवसात 20 अब्ज डॉलर्सने वाढली ‘ह्या’ बिझनेसमॅनची संपत्ती; अंबानी , वॉरेन बफे यांना टाकले मागे

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-चीनमध्ये बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणारे झोंग शांशान हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. अवघ्या 10 दिवसात या व्यावसायिकाची संपत्ती जवळजवळ 20 बिलियन डॉलर्सने वाढली आहे. मालमत्तेच्या बाबतीत झोंगने वॉरेन बफे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले.

एवढेच नव्हे तर आता तो जगभरातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. बाटलीबंद पाण्याव्यतिरिक्त झोंग कोरोना लस व्यवसायात देखील सामील आहे. झोंग शांशानची जवळपास 95 बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे.

कोरोना विषाणूमुळे जगभरातील आर्थिक परिस्थिती ढासळली असून बर्‍याच व्यवसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. असे असूनही झोंग शांशानने बराच नफा कमावला आहे. वास्तविक गेल्या वर्षी झोंग शांशानने बीजिंग वेंटाई बायोलॉजिकल फार्मसी कंपनी स्थापन केली.

या कंपनीने ही लस बनवण्याचे काम सुरू केले ज्यामुळे ही कंपनी चीनमध्ये खूप लोकप्रिय झाली आणि त्याने सतत आपली संपत्ती वाढविली. झोंग शांशानला चीनमध्ये लोन वुल्फ म्हणूनही ओळखले जाते. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्स निर्देशांकानुसार, झोंग शांशानची मालमत्ता मागील वर्षी 70.9 डॉलरवरून वाढून 77.8 डॉलर्सवर पोचली आहे.

झोंग शांशान यांच्या बाटलीबंद कंपनीचे नाव नोंगफू स्प्रिंग आहे. जो हाँगकाँगमध्ये खूप लोकप्रिय आहे. झोंग यांना आतापर्यंत चीनच्या बाहेर फारसे ओळखत नव्हते. बाटलीबंद पाणी आणि व्हॅक्सिनच्या व्यतिरिक्त झोंगने यापूर्वी मशरूम शेती, आरोग्यासारख्या व्यवसायात व्यापार करण्याचा प्रयत्न केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चीनमध्ये सुमारे 878 बिलियेनर आहेत, ज्यात जवळजवळ 257 अब्जाधीश असे आहेत कि जे नवीन आहेत. झोंग आता फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गपासून अवघ्या 6 अब्ज अंतरावर आहे. मार्क झुकरबर्गकडे सुमारे 101 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये सध्या अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे. तथापि, टेस्लाचे मालक एलन मास्क एक मात्र असा अब्जाधीश आहे कि ज्यांची संपत्ती 200 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button