‘नवनीत भाईंच्या जन्मशताब्दी’चा सोईस्कर विसर पडणार्‍या मनपाला कृतघ्न पालिकेचा पुरस्कार देणार – सुधीर मेहता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- शहराच्या शिल्पकराची जन्म शताब्दी आली आणि चालली पण ना कुणाला खंत ना कुणाला खेद. ज्या अर्बन बँक आणि पालिकेचे 40 वर्ष भाईनी नेतृत्व केले. त्या मनपालाही भाईंची जयांतीच माहिती नाही तर जन्मशताब्दी कधी आठवणार. एकजात सगळे कृतघ्न, ऐतिहासिक नगरीचे कृतघ्न असे नामांतर केले तर वावगे ठरणार नाही, अशा शब्दात नवनीत विचार मंचचे अध्यक्ष आणि नवनीत भाईंचे मानसपुत्र सुधीर मेहता यांनी मनपा वर घणाघाती हल्ला चढवला आहे.

नवनीत भाईंच्या निधनानंतर दरवर्षी नवनीत विचार मंच जयंती-पुण्यतिथी दिनी कार्यक्रम करते, पण कधीही पालिकेचे यात सहकार्य मिळाले नाही. लालटाकी पुढील सावेडी परिसराला ‘नवनीत नगर’ नाव देण्याचा ठराव झालंय, पण एकदा शिला शिंदे महापौर असताना पत्रकार चौकात 3 बाय 2 फुटाचा फलक लावला. मात्र नंतर फलक तर गायब आणि पुढे नवनीत नगरचा सर्वानाच विसर पडला.

सध्याच्या महापौरांनी भाईंच्या जयंती दिनात खूप आश्‍वासने दिली, पण सगळेच पालथ्या घडावर पाणी. अर्बन बँक सभागृहात दरवर्षी आम्ही जयंती-पुण्यतिथी कार्यक्रम करायचो तेव्हा दिलीप गांधी चेअरमन होते; पण सेवक-अधिकारी काही मोठ्या खुशीने सहभागी होत नसत. 16 हौसिंग सोसायटी गृहनिर्माण संस्था भाईंनी उभ्या केल्या. त्या कर्मचार्‍यांना सोसायटीवर भाईंच्या नावाचा फलक लावावत. बँक सावेडी शाखेला नवनीत नगर शाखा म्हणावे पण, स्व. घैसास सरांनी नगर भूषण कार्यक्रमात सावेडी शाखा नामांतर आणि सावेडी नामंतरासाठी घोषणा केली होती.

आर्किटेक्ट अशोक काळे यांनी नगर भूषण पुरस्कार आणि नवनीत नगरसाठी 100 फलक देण्याची जबाबदारी घेतली. पण कोरोना संकट आडवे आले. अशोक काळे यांना जे करावे वाटले ती जाणीव भाईंचे असंख्य उपकार असणार्‍यांना वाटत नाही; हे शहराचे दुर्दैवच. किमान भाईंनी जे बाळासाहेब देशपांडे दवाखाना, उद्याने, जलतरण तलाव, वाडिया पार्क क्रिडांगण तालमी, मंगल कार्यालये, दवाखाने, हाडको, सिद्धार्थनगर वसाहत, मुळेचे पाणी अगदी अमरधाम असे जे प्रकल्प आहेत ते जपणे तर दूर पण त्यावरील कोनशिला सुधा आमच्या राजकारण्यांनी नीट ठेवल्यास नाहीत.

या कृतघ्न नेत्यांना आता नगरकरांनी धडा शिकवावा, असे आवाहन मेहता यांनी उद्विग्नपणे केले आहे. साधे भाईंचे तैलचित्र, फोटो पालिकेत नाही, स्मारक किंवा पुतळा तर विचारच नको. आता कोरोना संकट थांबले नगर भूषण पुरस्कार भाईंच्या प्रकल्प वा फलक नवनीत नगरची अंमलबजावणी आणि जन्मशताब्दी भाईंचा कार्यक्रम यांची तयारी नवनीत विचार मंच ने सुरू केली असून, नवनीत भाईंबद्दल कृतज्ञता असणार्‍या सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन सुधीर मेहता यांनी केले आहे.

संस्था कार्यकर्ते नगरकरांनी आपल्या सूचना, विचार लिहून, आठवणीतील फोटो पुस्तक ग्रंथासाठी पाठवण्याची विनंती सुधीर मेहता यांनी केली. संपकासाठी मोबाईल 9284640477 वर संपर्क साधावा. चौकट या शहरात माणसांची किंमतच नाहीय, कामाची कुणालाच जाणीव नाहीय, भाईंच्या नगरभूषण नवनीत या दै. लोकायुग पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमास ना. वळसे पा., ना. ना. स. फरांदे सर, बाळासाहेब थोरात, आणि जिल्ह्यातील सर्व मान्यवर नेते होते. केंद्रात मंत्री असलेल्या बाळासाहेब विखे यांना जमले नाही तर ते दुसर्‍या दिवशी आले अन् घरी जाऊन सत्कार केला.

ते आले म्हणून स्वतंत्र नगर विकास कार्यक्रम शहर बँकेत केला होता जिल्ह्यातील पुढारी अन् आमचे काही अपवाद वगळता इतर कावळ्यांना मात्र कसलीही जाणीव नाही. संवेदना हरवल्याप्रमानेच सगळ्यांचं वागणे आहे. लातूरला रेल्वेने पाणी न्यावे लागले. आपण भाईंच्या कर्तृत्वामुळे मुळेचे पाणी पितोय, ड्रेनेज योजना झाली. आज सावेडीची ड्रेनेज योजना किंवा उड्डाणपूल मार्गी लागत नाही.

मात्र आता नुसत्याच टिमक्या वाजवणार्‍या पुढार्‍यांना वेगळीच करवत चालवावी लागणार आहे आणि सर्व मार्गाने नवनीत विचार मंच भाईसारख्या लोकोत्तर विकास पुरुषाची अपेक्षा करणार असेल तर, या कृतघ्न मनपा आणि या पुढार्‍यांना वठणीवर कसे आणायचे हे आपल्याला चांगले समजते अशा शब्दात सुधीर मेहता यांनी सर्वांना इशारा दिला आहे

Leave a Comment