धक्कादायक ! दिवसाढवळ्या दोन मुलांना पळविले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-संगमनेर शहर परिसरातील खांडगाव गावातून भरदिवसा ४ च्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांना पळवून नेण्याचा प्रकार घडल्याने पालक वर्गांत एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादीत मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे की,

९ जानेवारी रोजी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी काहीतरी फूस लावून किरण (वय वर्ष १४) व सादिक (वय वर्ष ११ दोघे रा. खांडगाव, ता. संगमनेर) या दोघांना पळवून नेले.

पोसई माळी हे मुलांचा व त्यांना पळवून नेणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान मुलांना पळवून नेल्याच्या घटना नगर शहरात देखील घडल्या आहेत. मात्र या प्रकरणाचा तपास लावण्यात अद्यापही पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही.

दिवसाढवळ्या मुलांना पळविले जात असून पोलीस या घटनांना रोख बसावा यासाठी काय करत आहेत ? असा संतप्त सवाल पालकवर्गातून होत आहे.

Leave a Comment