भारतामधील ‘ही’ रेल्वे आहे जगातील पहिले चालते फिरते हॉस्पिटल; त्यातील वैद्यकीय सुविधांबाबत ऐकल्यास बसेल धक्का

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- देशात वैद्यकीय सुविधांचा उल्लेखनीय विस्तार झाला आहे, परंतु अद्यापही देशातील बर्‍याच भागात या सुविधा पोहोचल्या नाहीत. जेव्हा या भागात राहणाऱ्या लोकांना डॉक्टरांची आवश्यकता असते तेव्हा त्यांना बरेच किलोमीटर प्रवास करावा लागतो.

अशा परिस्थितीत जवळजवळ 30 वर्षांपूर्वी 1991 मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने लाइफलाईन एक्सप्रेस सुरू केली गेली होती. गेली तीन दशके ही रेल्वे ग्रामीण भारतात सतत सेवा देत आहे. सध्या ही ट्रेन आसाममधील बदरपुर स्टेशनवर थांबली असून लोकांवर मोफत उपचार केले जात आहेत.

इम्पेक्ट इंडिया फाउंडेशन, आरोग्य मंत्रालय आणि भारतीय रेल्वे यांनी ही ट्रेन (जीवन रेखा एक्सप्रेस) सुरू केली. ट्रेनला आंतरराष्ट्रीय वित्त संस्था, कंपन्या आणि व्यक्तींकडून निधी प्राप्त होतो. लाइफ लाइन एक्सप्रेसच्या धर्तीवर इतरही अनेक देशांत अशाच गाड्या चालवल्या गेल्या आहेत आणि त्या त्यांच्या कार्यात यशस्वी ठरल्या आहेत.

ऑपरेशन थिएटर सुविधा :- यातील सुविधांविषयी सांगायचे झाले तर, विशेष डिझाइन एयर कंडिशन कोच स्थापित केले आहेत. 2007 मध्ये भारतीय रेल्वेने पाच नवीन कोच जोडले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी एक कोच आहे. त्या कोचमध्ये खाण्यापिण्यापासून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तेथे गॅस स्टोव्हपासून फ्रीजपर्यंत ठेवण्यात आले आहे. दुसरा कोच मेडिकल स्टॉफ साठी तयार केला आहे. एका कोचला ऑपरेशन थिएटरचे स्वरूप देण्यात आले आहे. यात तीन ऑपरेटिंग टेबल्स आहेत. या ऑपरेशन थिएटरमध्ये अ‍ॅडव्हान्स मेडिकल उपकरण बसविण्यात आले आहे.

स्थानिक डॉक्टरांनाही ट्रेनिंग :- ऑपरेशन थिएटरमध्ये क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजनही बसविण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील स्थानिक डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे उद्दीष्ट आहे. मुख्य ऑपरेशन थिएटरच्या शेजारी एक 6 बेडची रिकवरी रूम तयार केली गेली आहे. या ट्रेनमध्ये दात आणि डोळ्याच्या आजारांसाठी विशेष चाचणी कक्ष बनविण्यात आले आहेत. याशिवाय एक्स-रे आणि चाचणी प्रयोगशाळेची सुविधाही देण्यात आली आहे.

Leave a Comment