सुखद बातमी : अहमदनगर जिल्ह्यात शनिवारपासून ‘त्यांना’ मिळणार कोरोना लस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर काल कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे.त्यानुसार काल रात्रीच पुणे येथून ही लस आनली असून सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ती दिली जाणार आहे.

आता शनिवारपासून जिल्ह्यातील विविध केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असून यात सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असून, या लसीकरणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

अवघ्या जगात धुमाकूळ घालणारा कोरोनावर जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधत होते. त्यात आपल्या देशातील शास्त्रज्ञदेखील सहभागी होते.

अखेर पुण्यातील संस्थेने ही लस शोधली असून काल रात्रीपासून देशभरातील विविध भागात ही लस वितरीत करण्यासाठी पावली आहे.

त्यात अहमदनगर शहरासाठी देखील हे डेास उपलब्ध झाले असून शनिवारपासून जिल्ह्याभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. नुकताच जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला होता.

तो यशस्वी झाला आता प्रत्यक्षात लसीकरण मोहिमच राबवण्यात येणार आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

या लसहकरणासाठी प्रत्येक केंद्रावर १०० आरोग्य कर्मचाऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड केली जाणार आहे.शहरात एकूण ८ तर जिल्ह्यात एकूण २२ केंद्रावर ही लस देण्यात येणार आहे.

शहरातील मनपाची सात आरोग्य केंद्र व बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल असे एकूण आठ केंद्रावर शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. शहरातील ८ व जिल्ह्यातील १४ असे एकूण २२ केंद्रावर हे लसीकरण करण्यात येण्यात आहे.

Leave a Comment