जिल्ह्यात पहिल्या दिवशी २१ केंद्रांवर लसीकरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- पुणे येथील सीरम कंपनीची कोव्हीशिल्ड लस वापरायला सरकारने मंजुरी दिली आहे. १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण सुरु होणार आहे. नगर जिल्ह्यात पहिल्या दिवशी २१ केंद्रांवर प्रत्येकी १०० जणांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

तसे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३२ हजार आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेची १६ आरोग्य केंद्रे व महापालिका क्षेत्रातील ८ आरोग्य केंद्रा‌ंत पहिल्या दिवशी लस टोचण्यात येणार आहे.

प्रत्येक व्यक्तीला लस देण्यासाठी एक तास लागणार आहे. त्यामुळे १०० जणांना लस देण्यासाठी मोठे नियोजन करावे लागणार आहे. चार दिवसांपूर्वीच लस टोचण्याचे प्रात्यक्षिक झाले.

आता प्रत्यक्षात १६ जानेवारीपासून निश्चित केलेल्या केंद्रांमध्ये लस टोचली जाणार आहे. लस देण्यासाठी जिल्ह्यात ९३१ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Leave a Comment