जीपने बुलेटला दिली धडक; सहा जण जखमी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. नुकतेच मंगळवारी नगर-पुणे महामार्गावर पळवे शिवारात भरधाव वेगाच्या बोलेरो जीपने बुलेटला मागून जोराची धडक बसल्याने मोटारसायकलवरील दोनजण, तर बोलेरोमधील चारजण जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बुलेट मोटारसायकलवरून दोन प्रवासी जात असताना पाठीमागून आलेल्या बोलेरो कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बुलेटला जोराची धडक बसली.

यात बुलेटवरील दोघेही गाडीसह रस्ताच्या बाजुला जाऊन पडले. तर बोलेरो गाडीही पुढील गाडीला चुकवण्याच्या नादात रोडच्या खाली खोल खड्ड्यात जाऊन आदळली.

त्यामुळे बुलेटवरील दोघे, तर बोलेरोतील चार असे सहाजण जखमी झाले आहेत. जखमींना नागरिकांनी मदत करून सुपा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!