निळवंडे धरणाबाबत जलमंत्री जयंत पाटील म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-२०२३-२०२४ पर्यंत अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे सगळे काम पूर्ण होईल. पाणी महत्त्वाचे आहे, ते आले पाहिजे हा आग्रह सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांचा होता.

निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर संगमनेर तालुक्यात उसाचे क्षेत्र अजूनही वाढणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. १३) आयोजित जयंती महोत्सव साजरा झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे होते . यावेळी व्यासपीठावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे,

माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे संचालक लक्ष्मण कुटे, राजीव शिंदे, उत्कर्षा रुपवते,

श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मंत्री पाटील यांच्या या घोषणेमुळे संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहाता ,राहुरी व नेवासा ह्या भागातील शेतकऱ्यांच्या भावना पुन्हा उंचावल्या आहे.

हे जर पाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळाले तर निश्चितच हा भाग सुजलाम सुफलाम होईल असे शेतकऱ्यांचे आशा आहे.

Leave a Comment