मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्यासह बैठक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-निंबळक येथे घरकुल वंचितांसाठी उभे राहत असलेल्या आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाची बैठक नुकतीच पार पडली.

यामध्ये घरकुल वंचितांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत राज्य व केंद्राकडून विशेष बाब म्हणून साडेतीन लाख रुपये अनुदान मिळण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेत घरकुल वंचितांच्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन देत

सोलापूरच्या धर्तीवर अहमदनगरला सुध्दा विशेष बाब म्हणून अनुदान मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. या बैठकीसाठी नगर विभागाचे उपसंचालक आकाश बागूल, श्रीनिवास महादेवराव, सुनिलकुमार पठारे, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी निखील ओसवाल,

संघटनेचे अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन उपस्थित होते. निंबळक शिवारात मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजना राबविण्यत आली आहे. घरकुल वंचितांना 80 हजार रुपयात एक गुंठा जागा मिळत असली, तरी घर बांधण्याचा मोठा प्रश्‍न आहे.

ग्रामीण भागासाठी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत अत्यंत कमी अनुदान मिळते. या अनुदानात घरकुल वंचितांचे घरे साकार होऊ शकत नाही. नगरचे जिल्हाधिकारी सोलापूरला असताना त्यांनी विशेष बाब म्हणून आडम सरांनी घरकुल वंचितांसाठी केलेल्या प्रकल्पाला साडे तीन लाखाचे अनुदान मंजूर करुन आनले होते.

त्याचप्रमाणे नगरच्या घरकुल वंचितांसाठी हे अनुदान मिळाल्यास घरकुल वंचितांना घर बांधण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने बैठकित स्पष्ट करण्यात आली. जिल्हाधिकारी भोसले यांनी सोलापूरला घरकुल वंचितांचे प्रकल्प यशस्वीपणे पुर्ण करणारे

आडम मास्तरांना संपर्क करुन संघटनेला मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे सांगितले. आडम मास्तरांनी देखील नगरला घरकुल वंचितांचा प्रकल्प उभा राहण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. शहरी भागात पुरेशी सरकारी जागा उपलब्ध नाही, तर खाजगी जमीन महाग असल्याने घरकुल वंचितांचा प्रकल्प उभा करणे अशक्य आहे.

शहरालगत असलेल्या गावातील खडकाळ पड जमीनीवर संघटनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना कमी किंमतीत जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. घरकुल वंचितांना केंद्र व राज्याचे साडे तीन लाखाचे अनुदान मिळाल्यास घर बांधण्याचा प्रश्‍न सुटणार असल्याचे अ‍ॅड. गवळी व अशोक सब्बन यांनी सांगितले.

तर ग्रामीण भागातील घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी गावा-गावात महसुल घरकुल लोकअदालत भरविण्याचा मुद्दा उपस्थित केला. या लोकअदालतद्वारे गाव पातळीवर सर्कल,

तलाठी यांच्या सहमतीने घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यास बैठक घेऊन त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे स्पष्ट केले. यावर जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी निखील ओसवाल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. या बैठकित घरकुल वंचितांच्या प्रमुख प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली.

Leave a Comment