Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthPolitics

७०५ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान २ हजार ५५३ केंद्र : साहित्यासह १२ हजार ७६५ कर्मचारी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार  ७८८ सदस्य पदांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नियोजन केले आहे.

तब्बल १२ हजार ७६५ कर्मचारी ईव्हीएम मशीन व अन्य साहित्यासह २ हजार ५५३ मतदान केंद्रावर दाखल झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील तब्बल ७६७ ग्रामपंचायतींच्या पंचावर्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

जिल्ह्यात एकूण एक हजार ३१८ ग्रामपंचायती आहेत. दर पाच वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक अधिनियमानुसार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगामार्फत होत असते.

फेब्रुवारीमध्ये देशात कोरोना महामहारीचे संकट निर्माण झाले.त्यामुळे स्थगित झालेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरु झालेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकी संदर्भातील प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संचालनात युद्धदपातळीवर सुरु आहे.

दि. २३ पासून संगणकीय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. तसेच नामांकन सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने त्रांतिक असुविधा लक्षात घेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची मुभा दिली होती. अंतिम मुदतीपर्यंत ७६७ ग्रामपंचायतींसाठी एकूण  २३ हजार ८०१ अर्ज दाखल झाले होते.

छाननी प्रक्रियेनंतर २३ हजार १४८ उमेदवारी अर्ज वैध ठरले. दरम्यान,सोमवार दि. ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. या मुदतीत जिल्हाभरात एकूण ९ हजार १० इच्छूकांनी आपले अर्ज माघारी घेतले.त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या १३ हजार १९४ झाली.

दरम्यान. १३ हजार १९४ उमेदवार मतदारांचा कौल आजमावणार आहे. शुक्रवार दि. १५ जानेवारीस मतदान प्रक्रिया संपन्न आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी तहसीलदार यांच्या निर्देशात मतदानाचे साहित्य घेवून मतदान केंद्राकडे रवाना झाले. सोमवार दि. १८ जानेवारीस होणाऱ्या मतमोजणीतून ‘कोणावर गुलाल” याचा निकाल लागणार आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button