लोकप्रतिनिधी सरकारदरबारी आपले वजन वापरून तालुक्याला पाणी उपलब्ध करून देणार आहेत का?

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर धरणातील पाणीपातळी कमी होत जाते, तसा पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.

पायथ्याशी धरण असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना हा प्रश्न नेहमी भेडसावत असतो, असे पिचड म्हणाले. हे टाळण्यासाठी भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधल्यास पाणलोट क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल; मात्र आमदारांनी ती मानसिकता ठेवणे आवश्यक आहे.

Advertisement

अकोले तालुक्यात प्रवरेतील प्रोफाईल वॉल बांधून तालुक्यात पाण्याची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी सरकारदरबारी आपले वजन वापरून तालुक्याला पाणी उपलब्ध करून देणार आहेत का? असा सवाल माजी आमदार वैभव पिचड यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत पत्रकात पिचड यांनी म्हटले, की स्व. बाळासाहेब विखे, माजी मंत्री मधूकरराव पिचड यांनी कोकणात पाणी वाहून जाऊ नये, म्हणून ते प्रवरेत वळवून त्याचा फायदा जिल्ह्यासह दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्याला मिळावा म्हणून वळण बंधारे करण्याचे ठरविले. तत्कालीन सरकारने त्याला मंजुरी दिली होती.

Advertisement

यापुढेही तो विषय सरकारी पातळीवर होणार आहेच; मात्र प्रोफाईल वॉलसाठी १२ जागा निश्चित करण्यात आल्या असून माजी मंत्री पिचड यांनी त्यास मंजुरीदेखील घेतली आहे.

केंद्रीय जल आयोगाने त्यास मान्यता दिली आहे, मग हा प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक असताना तालुक्याच्या आमदारांनी जलसंपदा विभाग व सरकारदरबारी आपले वजन वापरून ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

Advertisement

मात्र ते गप्प आहेत. कालव्याच्या प्रश्न सोडविणसाठी म्हालादेवी पुल, पिंपरकणे पुल ही कामे मार्गी लागणे आवश्यक आहे. युती सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेतल्यामुळे पुलाचे काम झाले; मात्र गेल्या वर्षभरापासून हे काम बंद आहे.

त्यासाठी निधीची आवश्यकता असून तो निधी आणून काम सुरू होणे आवश्यक आहे. असेही पिचड म्हणाले. पिचड यांनी पुढे म्हटले, की तालुक्यात पाणी अडविण्यासाठी साईड उपलब्ध असून त्याचे प्रस्ताव सरकारदरबारी पाठवून मंजुरी आणणे आवश्यक आहे; मात्र त्याबाबत उदासीनता असून किमान एखादा बंधारा तरी मंजूर करा, असा टोमणाही पिचड यांनी लगावला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button