संपर्क : 9422736300 I 9403848382

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे श्री नागेश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या केटीवेअर मध्ये आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.

याविषयीची सविस्तर माहिती अशी की, रोजंदारीवर काम करण्यासाठी आलेल्या देविदास भानुदास साळवे (वय २५) घटपिंपरी (जि. बीड) हा आपल्या वयस्कर आईसोबत मजुरीसाठी या परिसरात आला होता.

Advertisement

आळेफाटा येथून काम करुन ते भाळवणी येथे आले होते. मंगळवार दि. १९ रोजी दुपारी चारच्या सुमारास  येथे आंघोळीसाठी आला होता .

त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गेल्या तीन वर्षांपासून या भागात कामासाठी फिरत असून गावाकडे आमचे कोणीही नातेवाईक नाहीत.

Advertisement

एवढा एकच मुलगा होता तोही अविवाहित होता असे मयताची आई साखराबाई साळवे यांनी सांगितले. तसेच माझी कसलीही तक्रार नसल्याचे त्यांनी सागितले. सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथे पाठविण्यात आला असून

पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यासाठी येथील तरुणांनी वर्गणी जमा करुन खाजगी रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आला .

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button