Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू; शिर्डीतील घटना

277

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-शिर्डी परिसरात बाजारातळ भागातून एका अनोळखी ५५ वर्षांच्या इसमास तो गंभीर स्थितीत असल्याचे लक्षात आल्याने श्रीसाइंबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्याला डॉक्टरांनी तपासले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला होता. याप्रकरणी शिर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हा इसम कोण? त्याचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा पुढील तपास सफा कुऱ्हाडे हे करीत आहेत.

Advertisement

दुसऱ्या घटनेत डोर्हाळे येथील सागर बाळासाहेब मोगल, वय २० हा तरुण त्याच्या घरी बेशुद्ध पडला होता त्याला श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्याने काहीतरी विषारी औषध पिल्याचे उघड झाले.

उपचार सुरू असताना सागर मोगल हा मयत झाला. शिर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन सागर मोगल हा तरुण नेमका कोणत्या कारणाने विष पिला? का पिला? कसे पिला? याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement