जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व कायम

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी संपल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगत २१ उमेदवारांची नावे जा‍हीर केली.

या निवडणुकीतही जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे एकहाती नेतृत्व कायम राहिले. निवडलेले उमेदवार – उत्पादक सभासद सोनई गट – कारभारी डफळ, शंकरराव गडाख, घोडेगाव गट – बाबुराव चौधरी, लक्ष्मण पांढरे, खरवंडी गट – भाऊसाहेब मोटे, बापूसाहेब शेटे,

करजगाव गट – संजय जंगले, बबन दरंदले, दामोदर टेमक, नेवासे गट – नीलेश पाटील, नारायण पाटील, बाबासाहेब भणगे, प्रवरासंगम गट – बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गोरे, कडूबाळ कर्डिले, संस्था मतदारसंघ – नानासाहेब तुवर, अनु‍सूचित जाती-जमाती मतदारसंघ – कडूबाळ गायकवाड,

महिला प्रतिनिधी – ताराबाई पंडित, अलका जंगले, इतर मागासवर्गीय मतदारसंघ – बाळासाहेब बनकर, भटक्या विमुक्त जाती मतदारसंघ – बाळासाहेब परदेशी. एकूण १३८ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ११७ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे मोठा खर्च वाचला आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button