संपर्क : 9422736300 I 9403848382

बर्ड फ्लूमुळे ह्या तालुक्यातील हजारो कोंबड्या करणार नष्ट ! परिसरात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यात सुद्धा बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथे काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या कोंबड्या बर्ड फ्लू मुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासन या भागातील एक किलोमीटर परिसरातील सुमारे वीस हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावणार आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी मिडसांगवी, निंबळक, चिचोंडी पाटील, आठवड येथे सुमारे पावणे दोनशे कोंबड्या मृत आढळल्या होत्या.

Advertisement

याशिवाय श्रीगोंदे, जामखेड, तसेच नगर तालुक्यात काही वन्य पक्षी मृत सापडले होते. पशुसंवर्धन अधिकार्‍यांसह जिल्हा प्रशासन चिचोंडी पाटील भागातील एक किलोमीटरचा परिसर इफेक्टेड झोन म्हणून घोषित करणार आहे, तसेच या भागात असलेल्या सुमारे २० ते २२ हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या कोंबड्या मारण्याबाबत निर्णय होणार असून आहे. नगर तालुक्यात सुद्धा बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथे काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून या कोंबड्या बर्ड फ्लू मुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासन या भागातील एक किलोमीटर परिसरातील सुमारे वीस हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावणार आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी मिडसांगवी, निंबळक, चिचोंडी पाटील, आठवड येथे सुमारे पावणे दोनशे कोंबड्या मृत आढळल्या होत्या.

याशिवाय श्रीगोंदे, जामखेड, तसेच नगर तालुक्यात काही वन्य पक्षी मृत सापडले होते. श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु आतापर्यंत कोंबड्यांमध्ये मात्र बर्ड फ्लू असल्याचे आढळले नव्हते. दरम्यान, चिचोंडी पाटीलमध्ये मृत झालेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.

Advertisement

पशुसंवर्धन अधिकार्‍यांसह जिल्हा प्रशासन चिचोंडी पाटील भागातील एक किलोमीटरचा परिसर इफेक्टेड झोन म्हणून घोषित करणार आहे, तसेच या भागात असलेल्या सुमारे २० ते २२ हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button