डोनाल्ड ट्रम्प नवा पक्ष स्थापन करणार ? नाव असेल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झालेले डोनाल्ड ट्रम्प हे नवा पक्ष स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

निवडणुकीतील पराभवापासून अस्वस्थ असलेले ट्रम्प आपल्या रिपब्लिकन पक्षाला रामराम ठोकत ‘पॅट्रियाट’ नामक पक्ष काढणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

निरोपाच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राजकारणात कायम राहणार असल्याचे वक्तव्य केले. आपण सुरू केलेले आंदोलन ही तर केवळ सुरुवात आहे, असे ट्रम्प आपल्या समर्थकांना उद्देशून म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर ते नवीन पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. वॉल स्ट्रीट जनरल या आघाडीच्या अमेरिकन वृत्तपत्रानुसार नव्या पक्षाबाबत ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांसोबत सल्लामसलतदेखील केली आहे.

ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे रिपब्लिकनच्या गोटात चलबिचल वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही कालावधीपासून रिपब्लिकन पक्षदेखील दोन गटांमध्ये विभागला गेला आहे.

एका गटाचा ट्रम्प यांच्या फुटीरतवादी धोरणाला पूर्ण पाठिंबा आहे, तर दुसऱ्या गटाकडून ट्रम्प यांच्या वादग्रस्त भूमिका व वक्तव्याचा कडाडून विरोध केला जात आहे.

रिपब्लिकनचे नेते मिट मॅकॉनल यांनी मंगळवारी संसदेवर झालेल्या हल्ल्यासाठी ट्रम्प यांना जबाबदार धरले. ट्रम्प यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे समर्थकांनी संसदेवर हल्ला चढवल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment