Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

बांधावरील गावात पेटविल्याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार

653

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात सामाईक शेतीच्या बांधावरील गवत काट्या पेटविल्याच्या कारणावरून छाया बाबासाहेब रासकर, वय ४० रा. चांदा या शेतकरी महिलेस ५ जणांनी शिवीगाळ करुन काठीने पायावर, मांडीवर मारून जखमी केले. तर डोक्यात कुऱ्हाड मारुन डोके फोडले.

शिवीगाळ करून छाया रासकर या महिलेस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी शेतकरी महिला छाया बाबासाहेब रासकर यांनी सोनई पोलिसात फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी सुमनबाई साहेबराव रासकर,

Advertisement

संदीप साहेबराव रासकर, सुभाष साहेबराव रासकर, साहेबराव रामभाऊ रासकर, रावसाहेब रामभाऊ रासकर, सर्व रा. चांदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काल १०.३० वा. ही मारहाण झाली. हेकॉ गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

Advertisement