Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

मोठी बातमी ! मंत्री मुंडेंच्या विरोधातील तक्रार महिलेने माघारी घेतली

4,056

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. आता या अनुषंगाने एक मोठी बातमी समोर येत आहे.

मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं.

Advertisement

तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. नेमके प्रकरण काय आहे: जाणून घ्या सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता.

संबंधित तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं होते.

Advertisement

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता.

मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Advertisement

रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती.

मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा म्हणावा लागेल.

Advertisement