कोरोना ! पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दिवशी कोरोना लस घेणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-कोरोना लसीकरण मोहिमेला देशात 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते या लसीकरण मोहिमेत का सहभागी झाले नाहीत? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता.

या निमित्तानं कोरोना लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीही लसीकरणात सहभागी होणार असल्याचं जाहीर करण्यात आल आहे.

विरोधकांच्या प्रश्नांवर आता उत्तर मिळले असून आता कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी सहभाग घेणार आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह, अनेक राज्यांचे राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचा देखील समावेश असणार आहे.

सरकारने याआधीच स्पष्ट केले होते की, लसीकरणाची मोहीम विविध टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की व्हॅक्सिनेशनचा दुसरा टप्पा एप्रिलमध्ये सुरू होणार आहे.

ज्यामध्ये देशातील 50 पेक्षा अधिक वय असणाऱ्यांना मंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना व्हॅक्सिन दिलं जाईल. यामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार लोकसभेत 300 पेक्षा जास्त आणि राज्यसभेत जवळपास 200 खासदारांचे वय 50 पेक्षा जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button