‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याची अमरावती येथे बदली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नगरमध्ये विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना शासनाने अमरावती येथे नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे.

राठोड यांची नांदेड येथून बदली झाल्यानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी नगर येथे पदभार स्वीकारला होता. त्यांनी स्वतंत्र पथक स्थापन करून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध धंद्यावंर छापासत्र सुरू केले होते.

त्यांच्या पथकाने नगर शहरात बनावट डिझेलवर केलेली कारवाई चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. ही कारवाई करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे.

दरम्यान राठोड हे एका कॉस्टेबलसोबत आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा करत असल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिपही चांगलाच चर्चेचा विषय ठरली.

याच दरम्यान राठोड यांची शासनाने नगरमधून तडकाफडकी बदली केली. बदलीनंतर राठोड यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी मॅटमध्ये तक्रार केली होती.

मॅटच्या आदेशानुसार शासनाने त्यांना नियुक्ती दिली आहे. दरम्यान राठोड यांच्या व्हायरल क्लिपची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून चाैकशी सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!