पालकमंत्री हसन मुश्रीफ तीन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

रविवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत मुंबईहून हेलिकॉप्टरने भंडारदराकडे प्रयाण. सकाळी ९-४५ वाजता यश रिसोर्ट, शेंडी, भंडारदरा येथे आगमन व राखीव. सकाळी १०-३० ते दुपारी १२-३० वा. माजी आमदार कै. यशवंतराव भांगरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळाव्यास उपस्थिती.

दुपारी १ वाजता भंडारदरा येथून खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत हेलिकॉप्टरने अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी १-३० वाजता अहमदनगर येथे आगमन व राखीव. (स्थळ- आमदार संग्राम जगताप यांचे निवासस्थान). दुपारी २-३० वाजता डॉ. राकेश गांधी यांच्या सुरभि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्धाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ- गुलमोहोर रोड कॉर्नर,सावेडी). दुपारी ३-४५ ते सायं ४-१५ डॉ. सागर गडाख यांचे अॅपल हॉस्पिटलचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ- एमआयडीसी). सायंकाळी ४-३० वाजता अहमदनगर येथून वाहनाने पुणेकडे प्रयाण.

सोमवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १०-३० वाजता पुणेहून अकोळनेर (ता.नगर) येथे आगमन व तेथील जिल्हा पंचायत संसाधन केंद्र (डीपीएफसी) इमारत भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स. ११-३० वाता अकोळनेर येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण व दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १ ते ४ या कालावधीत जिल्हा नियोजन समिती बैठक, सूरत-नाशिक-अहमदनगर ग्रीन फील्ड रोड प्रोजेक्टबाबत लोकप्रतिनिधींना प्रकल्पाचे सादरीकरण. (स्थळ- माऊली सभागृह, सावेडी).

सायंकाळी ५ वाजता तनपुरे ट्रॅक्टर्सच्या शोरुमचे उद्धाटन. (स्थळ बोल्हेगाव फाटा, नागापूर.). सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव (मुक्काम). मंगळवार दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ९-१५ वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- पोलीस परेड ग्राऊंड, अहमदनगर).

सकाळी १० वाजता अहमदनगर येथून मोटारीने अणूशक्तीनगर, वरवंडी (ता. राहुरी) कडे प्रयाण आणि सकाळी १०-३० ते १-३० वा. तेथील हिन्दुस्थान अॅग्रो कोऑपरेटीव लि. प्रकल्पाची पाहणी, प्रकल्प सादरीकरण. दुपारी १-३० वाजता अणुशक्तीनगर, वरवंडी येथून भाळवणी, ता. पारनेर येथे प्रयाण. दुपारी २-३० वाजता भाळवणी येथे आगमन व साईराज पतसंस्था या संस्थेच्या विस्तारित इमारतीचे उद्धाटन. दुपारी ३-३० वाजता भाळवणी येथून मुंबईकडे प्रयाण

Leave a Comment