निवडणुकीच्या वादातून तरुणास मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात नुकतेच निवडणुकीचे वारे शांत झाले. सर्वत्र मतदान व मतमोजणी पार पडली असून निकाल देखील घोषित झाले आहे. आता निवडणुकीचे पडसाद हालिहाळू उमटू लागले आहे.

पारनेर तालुक्यातील काळकूप येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाऊसाहेब निवृत्ती अडसूळ यांना पाच जणांनी काठीने बेदम मारहाण केली.

याप्रकरणी भाऊसाहेब अडसूळ यांच्या फिर्यादीवरून वसंत भगवंत सालके, संदीप नाना सालके, ओंकार प्रदीप सालके, अतुल बबन सालके व किरण संदीप सालके यांच्याविरोधा पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, भाऊसाहेब निवृत्ती अडसूळ (वय ३९, रा. काळकूप, ता. पारनेर) हे भाळवणीवरून काळकूप येथे येत असताना वसंत भगवंत सालके व संदीप नाना सालके हे डस्टर गाडी रस्त्याला आडवी लावून अडसूळ यांची वाट पाहत होते.

अडसूळ हे त्यांच्याजवळ पोहचताच ‘तू ग्रामपंचायत निवडणुकीत भाषणे ठोकतो का?’ असा सवाल करून वसंत व संदीप यांनी भाऊसाहेब यांना अडविले.

याचवेळी ओंकार प्रदीप सालके, अतुल बबन सालके व किरण संदीप सालके हे बुलेटवरून घटनास्थळी आले. या पाचही जणांनी भाऊसाहेब निवृत्ती अडसूळ यांना शिविगाळ करून मारहाण केली.

मारहाणीनंतर किरण संदीप सालके याने भाऊसाहेब यांच्या डोक्यात काठीचा जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. घटनेनंतर पाचही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी भाऊसाहेब यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button