प्रेरणादायी ! घर सोडले तेव्हा खिशात होते केवळ 37 रुपये; मग केले ‘असे’ काही की आज करतोय करोडोंची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-‘कोशिश करनेवालों कि कभी हार नाही होती’ असे म्हटले जाते. याचेच उदाहरण म्हणजे आजची हि कहाणी. आज आपण प्रेरणादायीमध्ये कोलकाताच्या बिमल मजुमदारची कहाणी पाहणार आहोत. घरगुती दारिद्र्यामुळे वयाच्या 16 व्या वर्षी त्याला गाव सोडून कोलकाता येथे यावे लागले.

यानंतर त्याने बर्‍याच ठिकाणी लहान काम केले. पण, मनात काहीतरी वेगळंच होतं. शिकण्याची तीव्र इच्छा इतकी मोठी होती की त्याने चामड्याच्या कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करताना तो लपूनछपून ते काम करण्यास शिकला . आज त्यांची स्वतःची लेदर प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, ज्यांची करोडोची उलाढाल आहे.

Advertisement

बिमल हे गावात तांदूळ विकण्याचे काम करत परंतु त्यातून काही घर भागत नव्हते. यातच घरच्यांशी त्यांचे बिनसले आणि ते रागातच कोलकात्याला निघून आले. सोबत फक्त 37 रुपये होते. तेथे ते एका मित्राच्या रूमवर राहिले. तेथे त्याला एका मिठाईच्या दुकानात काम मिळाले .

तेथे त्याची ड्युटी सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत होती. काही दिवसांनी बिमलने कपड्यांच्या दुकानात काम करण्यास सुरवात केली. तेथे तीन वर्षे काम केले. मग मित्राने एका कारखान्याचा पत्ता दिला. ती औषधाची फॅक्टरी होती. तेथे सुरक्षा रक्षकांची गरज होती. बिमलने तेथील संरक्षक म्हणून काम करण्यास सुरवात केली.

Advertisement

काही दिवसांनंतर कंपनीने त्याला चामड्याच्या कारखान्यात ट्रांसफर केले. बिमल लेदर फॅक्टरीत दिवसाच्या नोकरीनंतर त्याने स्वत: रात्री काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो, ‘मी तेथे असलेल्या मॅनेजरशी चांगली मैत्री केली होती. त्यांनी रात्री मशीनवर काम करण्याची परवानगी दिली.

तो त्याने दिवसा पाहिलेली कामे, रात्री एकटाच असताना करून पाहू लागला. दरम्यान, वडिलांचा मृत्यू झाल्याने बिमल गावात परतला. काही दिवसांनंतर मित्राने मुंबईला नेलं, पण तेथे काहीच काम मिळाले नाही. बिमल म्हणतो, “त्यानंतर काही दिवसांनी कोलकाता येथे आलो आणि त्याच जुन्या मित्रांशी नोकरीसाठी संपर्क साधला.

Advertisement

लेदर वस्तूंच्या कंपनीत काम केले. यापूर्वी दोन लेदर कंपन्यांमध्ये काम केल्यामुळे त्याचा अनुभवही होता. पण, यावेळी नोकरीबरोबरच त्याने थेट ऑर्डरही घ्यायला सुरवात केली. बिमल म्हणतो, ‘मी लेदर पर्सचे नमुने दुकानात घेऊन जात असे. यातून कमिशन मिळत होते आणि ग्राहकांशी जोडला जात होतो.

बर्‍याच वेळा लोकांनी असेही म्हटले की ते चोरीचे उत्पादन आहे, खरेदी करणार नाही, परंतु मी माझे काम करत राहिलो. दिवसा काम करायचे. संध्याकाळी ऑर्डरसाठी दुकानात जायचो. बिमल, जे आता 45 वर्षांचे झाले आहेत ते म्हणतात ‘हे अनेक महिन्यांपासून चालू राहिले. एक दिवस मी खादिमच्या शोरूममध्ये पोहोचलो.

Advertisement

तेथील मालकाशी थेट बोललो. माझी मेहनत आणि समर्पण पाहून त्याने मला दोन लाख रुपयांची ऑर्डर दिली. या ऑर्डरने माझे आयुष्य बदलले. ‘ 2012 मध्ये बिमलने आपली नोकरी सोडली आणि ‘लेदर जंक्शन’ ही कंपनी सुरु केली.

यानंतर त्याने आणखी दोन कंपन्या स्थापन केल्या आहेत. मागील वर्षी त्यांची उलाढाल सुमारे तीन कोटी रुपये होती. ते 20 ते 25 लोकांना रोजगार देतात. आता बिमलची उत्पादने ऑफलाइन तसेच ऑनलाईन उपलब्ध आहेत. शूज वगळता ते सर्व लेदर उत्पादने ऑर्डरनुसार बनवतात.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button