राखी सावंतने लग्नाबाबत केला धक्कादायक खुलासा!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-‘बिग बॉस 14’ हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. ‘बिग बॉस 14’चा काल शनिवारी प्रसारित झालेला एपिसोड एकदम खास होता. या एपिसोडची होस्ट होती काम्या पंजाबी आणि एपिसोडमध्ये सुरुवात झाली ती सवाल-जवाबाने.

बिग बॉस १४ ’ चा काल शनिवारी प्रसारित झालेला एपिसोड प्रेक्षकांसाठी स्पेशल ठरला. कारण कालचा एपिसोड मिडिया स्पेशल होता. यादरम्यान बिग बॉसच्या घरात एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पत्रकारांनी घरातील सदस्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडलं. नेहमीप्रमाणे यावेळी सगळ्यांच लक्ष वेधलं ते राखी सावंतने. यावेळी सगळ्या प्रश्नांमध्ये एका प्रश्नाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

तुझ्या लग्नाची इतकी चर्चा का होते? तू खरंच लग्न केले की हा सगळा ड्रामा आहे? असा प्रश्न राखीला यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राखीने केलेल्या खुलाशाने सगळ्यांना धक्का बसला.

मी विवाहित आहे आणि पतीची प्रतीक्षा करत आहे. माझ्या आयुष्यात काही अडचणी होत्या आणि म्हणून मला लग्न करावे लागले असे राखी म्हणाली. पुढे तिने जे काही सांगितले ते ऐकून तर सगळेच हैराण झालेत.

ती म्हणाली, ‘काही लोक अर्जंट शॉपिंगला निघतात, काही अर्जंट ब्रेकअप करतात. तसेच मी अर्जंट लग्न केले. भारतातील एका मोठ्या व्यक्तिने मला धमकी दिली होती.

मी लग्न केले नाही तर तो मला उचलून नेईल, अशी धमकी त्याने मला दिली होती. मी याबद्दल पोलिसात तक्रार केली नाही. मी धमकी देणाºया त्या व्यक्तिचे नाव सांगितले तर तो आत्ताच मला शो बाहेर काढेन.

त्या व्यक्तिच्या धमकीमुळेच मी लग्न केले. यात माझा पती रितेशचा काहीही गुन्हा नाही. माझ्याशी लग्न कर, असे मी त्याला म्हणाले. लग्नाआधी ना त्याने मला पाहिले होते, ना मी त्याला. मी फक्त त्याचे बँक बॅलेन्स पाहिले.’

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!