सरकारसोबत मिळून 2.50 लाखांत सुरू करा तुमचा व्यवसाय, दरमहा 30 हजारांपर्यंत होईल कमाई

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-सर्वसामान्यांवरील औषधाचा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान भारतीय जनऔषधि परियोजना सुरू केली होती.

या माध्यमातून देशातील दुर्गम भागातील लोकांना स्वस्त औषध देणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे. जनऔषधि केंद्रांवर जेनरिक औषधे 90 टक्के पर्यंत स्वस्त मिळतात. मार्च 2025 पर्यंत जनऔषधि केंद्रांची संख्या 10,500 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट भारत सरकारचे आहे. अशा परिस्थितीत आपण जन औषधि केंद्र सुरू करुन आपण पैसे कमाऊ शकता.

Advertisement

अर्थ मंत्रालयाने ट्विट केले की सर्व 734 जिल्हे या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. जन औषधी केंद्रात वितरित औषधांची संख्या वाढवून 1,449 केली आहे. आतापर्यंत जन औषधी योजनेंतर्गत देण्यात आलेल्या सर्जिकलची संख्या 204 करण्यात आली आहे.

जन औषधी केंद्र कसे सुरू होईल? :- जेनेरिक मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी केवळ 2.50 लाख रूपये खर्च येतो . जेनेरिक मेडिकल स्टोअर्स सुरू करण्यासाठी सरकारने तीन प्रकारची कॅटेगिरी तयार केली आहे. पहिल्या कॅटेगिरी नुसार, कोणतीही व्यक्ती,

Advertisement

बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा नोंदणीकृत मेडिकल प्रैक्टिशन स्टोअर सुरू करू शकते. ट्रस्ट, एनजीओ, खासगी रुग्णालय, सोसायटी बचतगट यांना द्वितीय श्रेणी अंतर्गत संधी मिळणार आहे. तिसर्‍या प्रकारात राज्य सरकारकडून नामनिर्देशित एजन्सी असतील.

महत्त्वाच्या गोष्टी :-

Advertisement
  • >> 120 चौरस फूट क्षेत्रात दुकान असणे आवश्यक आहे. स्टोअर सुरू करण्यासाठी सरकारकडून 1400 औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
  • >> जन औषधी केंद्राने औषधांच्या विक्रीतून 20 टक्क्यांपर्यंत नफा कमावता येतो.
  • >> या व्यतिरिक्त, प्रत्येक महिन्याच्या विक्रीवर स्वतंत्र 15% इंसेंटिव दिले जाते, जरी प्रोत्साहन देण्याची कमाल मर्यादा दरमहा 10,000 रुपये निश्चित केली जाते.
  • >> अडीच लाख रुपये पूर्ण होईपर्यंत ही प्रोत्साहनपर सुविधा उपलब्ध आहेत.
  • >> नक्षलग्रस्त व ईशान्येकडील राज्यांमध्ये दरमहा 15 हजार रुपये प्रोत्साहनपर मर्यादा आहे.

जन औषधी केंद्रासाठी, रिटेल ड्रग सेल्स चे लायसेन्स जन औषधी केंद्राच्या नावावर घ्यावा लागेल. त्यासाठी http://janaushadhi.gov.in/online_registration.aspx येथून फॉर्म डाउनलोड करता येईल. जर तुम्हीसुद्धा एका महिन्यात 1 लाख रुपयांची औषधे विकले तर महिन्यास तुम्ही 30 हजार रुपये कमवाल.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button