त्या बाबांचा सोशल मीडियामुळे लागला तपास

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- घरात न सांगता देवदर्शनासाठी गेलेले फरांदे बाबा २० दिवसांपासून बेपत्ता होते. कुटुंब व नातेवाईक त्यांना शोधत होतेे; मात्र नाशिक येथून त्यांचे नाव व छायाचित्र सोशल मीडियावर टाकण्यात आले आणि काही तासातच त्यांची व परीवाराची भेट घडून आली.

सोनई येथील भगवान म्हस्कू फरांदे (वय ८०) हे मागील महिन्यात बेपत्ता झाले होते. कुटुंब व नातेवाईकांनी त्यांना सर्वत्र शोधले; मात्र कुठेच त्यांचा तपास लागला नव्हता. संपुर्ण कुटूंब चिंतेत होते. नाशिक येथील अविनाश सुर्यवंशी यांनी फरांदे यांची विचारपूस केली.

त्यांना घरातील कुणाचाच मोबाईल नंबर पाठ नव्हता. सूर्यवंशी यांनी त्यांचे नाव, गाव व छायाचित्र सोशल मीडियावर टाकले आणि तपासाला गती आली. नगर येथील शिरीष सोनवणे यांनी ही पोष्ट सर्वत्र व्हायरल केली. नंतर हा संदेश विनायक दरंदले यांच्या ‘आम्ही सोनईकर’सह नेवासे तालुक्यात फिरला ‘सोनईकर’चे ग्रुप सदस्य व स्टाईल टेलर्सचे संचालक अशोक शिरसाठ यांनी त्यांना ओळखले व फरांदे बाबांचा मुलगा हेमंत यांना सर्व माहिती दिली.

हे ऐकून सर्व फरांदे परीवाराचा जीव भांड्यात पडला. काल सायंकाळी मुलगा, सून व नातेवाईक भगवान फरांदे यांना आणण्यासाठी नाशिकला रवाना झाले. आयटीआय सिग्नल, सातपूर येथून त्यांना काल सुखरूप घरी आणण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!