पुढील महिन्यात संरक्षण मंत्री नगरमध्ये येणार!

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :-शहरातील बहू प्रतिक्षित असलेल्या उड्डाणपुलाचे अखेर सुरू झाले आहे. तसेच हे काम वेगात सुरू झाले असून, हा पुल आता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे येत्या १५ ते ३० फेब्रुवारी दरम्यान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नगरला आणून त्यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

Advertisement

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येथील व्हीआरडीई संस्थेला भेट देणार असून, तसेच केके रेंज बाधित त्या २३ गावांच्या सरपंचांची देखील त्यांच्याशी भेट घडवून दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

नगरच्या बायपास मजबुतीकरणासाठी ८०० कोटी तसेच नुकत्याच नगर ते शिर्डी रस्त्यासाठी ५०० कोटी रुपये मंजूर झाले असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दि.७ मार्चला या दोन्ही कामांचे भूमिपूजन केले जाणार असल्याचेही खासदार डॉ. विखेंनी सांगितले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button