त्याची झुंज अपयशी… अखेर जे नको व्हायला तेच घडल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-देशभरात आज ७२ वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील एका वृद्ध नागरिकाने पोलीस स्टेशनमध्येच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.

अनिल शिवाजी कदम (७०) असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ते या दुर्घटनेत ६० टक्क्यांहून अधिक भाजले होते. संगमनेर तालुक्यातील खांडगावमध्ये सहानुभूती म्हणून एका भाडेकरूला घर दिले आणि त्याने ते बळकाविण्याचा प्रयत्न केला.

एक वृद्ध म्हणून बळाचा वापर करू शकत नसल्याने त्यांनी कायद्यावर विश्वास ठेवत पोलीस ठाणे आणि सरकारी कार्यालयाचे उंबरे तब्बल तीन ते चार वर्षे झिजविले. मात्र अखेर न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी चक्क प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मृत्युला कवटाळून दिवसा ढवळ्या भर पोलीस ठाण्याच्या आवारात,

तहसिलदार आणि पोलीस निरीक्षकाच्या समोर स्वत:ची जिवणयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता. आज अनिल शिवाजी कदम (वय 73, रा. खांडगाव, ता. संगमनेर) यांनी लोणी येथील रूग्णालयात उपचार घेत असताना हतबल होऊन अखेरचा श्वास घेतला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि,

अनिल कदम यांचा गणेशवाडीतील सादिक रज्जाक शेख व सुमय्या सादिक यांच्यासोबत जमिनीचे व्यवहार झाले होते. मात्र, जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला नसल्याने दोघांत वाद झाले. शेवटी हा वाद कोर्टापर्यंत गेला. सादिक यांच्या कुटूंबाला घरातून बाहेर काढावे, अशी मागणी अनिल कदम करत होते.

पंरतु, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पोलिसांनी यात हस्तक्षेप करण्यास असमर्थता दर्शवली होती. प्रजासत्ताकदिनी सरकारी ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी परतत असतानाच आधीच तहसील कार्यालयाच्या आवारात आलेल्या अनिल कदम यांनी अचानक अंगावर रॅकेल ओथून घेतले आणि आग लावून घेतली.

हा प्रकार लक्षात येताच सहाय्यक फौजदार राजू गायकवाड यांनी धाव घेत पेटलेल्या कदम यांच्यावर पाणी टाकले. त्यांना लगेच रुग्णालयात हलविण्यात आले. आगीत ते सुमारे साठ टक्के भाजले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्नालयात दाखल केले होते मात्र अखेर आज त्यांची 50 तासची मृत्युशी झुंज अपयशी पडली आणि वृद्ध व्यक्तीला जीव गमवावा लागला.

Leave a Comment